शाओमी देशात खोलणार ५ हजार मी स्टोर्स

mi-store
चीनी स्मार्टफोन, टीव्ही आणि घरगुती वापराच्या वस्तू विकणारी शाओमी पुढील वर्षअखेर भारतात ५ हजार मी रिटेल स्टोर्स सुरु करणार आहे. नुकताच या कंपनीने भारतात १४ राज्यात २९ ऑक्टोबर २०१८ ला एकाच दिवशी एकाच वेळी ५०० मी स्टोर्स सुरु करून गिनीज बुक मध्ये हा विक्रम नोंदविला आहे. त्यापाठोपाठ आता हा नवा विक्रम करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.

शाओमीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारत प्रमुख मनु जैन यांनी मंगळवारी कंपनीची ५ हजार स्टोर्स सुरु करण्याची योजना तयार झाल्याचे जाहीर केले. ते म्हणाले या स्टोर्स मुळे निमशहरी आणि ग्रामीण भागात १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. मी स्टोर्स ऑफलाईन विस्तारासाठी ग्रामीण बाजारावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या पाच तिमाहीत कंपनीने स्मार्टफोन विक्रीत सलग नंबर वन स्थान कायम राखले आहे. तसेच सर्वाधिक रिटेल स्टोर्ससाठी जगात आणखी एक गिनीज रेकोर्ड नोंदविले आहे.

Leave a Comment