या तरुणीने शरीरावर विक्रमी संख्येने गोंदले आहेत टॅटू

tejasvi
मुंबईची तेजस्वी प्रभुलकर या २१ वर्षीय तरुणीने शरीरावर १०३ टॅटू गोंदवून विक्रम केला असून तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदले गेले आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिचे फोटो शेअर केले असून त्यामुळे ती रातोरात प्रसिद्धीच्या प्रकाशात आली आहे.

तेजस्वी वयाच्या १७ व्या वर्षीपासून शरीरावर टॅटू काढून घेत आहे आणि गेली चार वर्षे तिचा हा उद्योग सुरु आहे. आयुष्यातील विशेष घटना आणि क्षण ती टॅटूरूपाने शरीरावर कोरते आहे. ती सांगते तिच्या आईवडिलांना टॅटू कोरून घेतलेले अजिबात आवडले नव्हते पण तिने त्यांचाच टॅटू शरीरावर गोन्डविला. आता त्यांचा विरोध कमी झाला आहे. तिने या सर्व टॅटूसह फोटोसेशन केले आहे.

तेजस्वी सांगते एक टॅटू काढला कि आता पुढचा दुसरा टॅटू कोणता काढायचा याचा विचार तिच्या मनात सुरु होतो आणि त्यामुळेच इतक्या संख्येने तिने टॅटू गोंदवूनही तिचे अजून समाधान झालेले नाही.

Leave a Comment