युरोपसह अमेरिकेत फेसबुकचे मेसेंजर ठप्प

facebook
सॅन फ्रान्सिस्को – फेसबुकवरील सुरु असलेले अडचणींचे शुक्लकाष्ठ सुरूच असून जगभरात नुकताच फेसबुकचे अकाउंट वापरताना न्यूज फीड येत असल्याने वापरकर्त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले होते. अशात मध्यरात्री युरोप आणि अमेरिकेत फेसबुकचे मेसेंजर ठप्प झाले.

जगभरातील डिजिटल वर्ल्ड आणि मेसेंजर अॅपची माहिती डाऊनडिटेक्टर हे पोर्टल साठविते. या पोर्टलच्या माहितीनुसार काल मध्यरात्रीपासून काही तासासाठी फेसबुक मेसेंजरचे काम ठप्प झाले. अद्याप यामागील कारण फेसबुकला आढळून आलेले नाही. मेसेंजर हे विश्वसनीय असून सप्टेंबरमध्ये फक्त अडचणींचा वापरकर्त्यांना सामना करावा लागला होता, असे फोर्ब्सच्या अहवालात म्हटले आहे.

फेसबुकने नुकतेच वापरकर्त्यांना फेसबुकचे मेसेज डिलीट करण्याचा पर्याय करुन दिला आहे. फेसबुक वॉच व्हिडिओज टुगेदर या मेसेंजर फिचर्सची तपासणी करत आहे. यामध्ये ग्रुप चॅट करताना वेगवेगळ्या डिव्हाईसवर ग्रुप व्हिडिओची सुविधा असणार आहे. हे बदल करताना फेसबुकच्या मेसेंजरमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment