भारतात वेगाने फोफावतोय वेडिंग टुरिझमचा ट्रेंड

wedding
जगभरात भारतीय संस्कृती, रूढीरिवाज याबद्दल अपार कुतूहल आहे. भारतातील विविध सण, उत्सव, अनेक पर्व यात सहभागी होण्यासाठी परदेशी पर्यटक आवर्जून येतात. त्यात आता भारतातील विवाह परंपरा समाविष्ट झाली आहे. भारतीय विवाहांना परदेशात बिग फॅट वेडिंग म्हणजे चिकार खर्च करून केली जाणारी लग्ने असेच म्हटले जाते. याचाच फायदा भारतात वेडिंग टुरिझम ट्रेंड फोफावण्यात झाला आहे.

वेडिंग टुरिझमची माहिती देणारी अनेक पोर्टल असून विविध देशातील पर्यटक भारतीय विवाहांना हजेरी लावत आहेत. विशेषतः मुंबई, दिल्ली, जयपूर या शहरात हे टुरिझम चांगलेच बस्तान बसवत आहे. यासाठी निर्माण केलेल्या पोर्टलवर भारतीय जोडपी त्यांच्या विवाहासाठी परदेशी पर्यटकांना आमंत्रण देऊ शकतात. दोन दिवस विवाह कार्यक्रम असतील तर १५० डॉलर्स त्यासाठी आकारले जातात. जेवान्खानासः विवाह समारंभात सहभागी होण्यासठी २५० डॉलर्स तर लग्नाचे खास कपडे, हॉटेल निवास, प्रवासखर्च, मेंदी, संगीत या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेगळे पैसे आकारले जातात.

विशेष म्हणजे परदेशी पर्यटक आवर्जून असे लग्न समारंभ पाहण्यासाठी खर्च करून येतात. भारतात जळजळ प्रत्येक राज्याची विवाह परंपरा वेगळी आहे त्यामुळे परदेशी लोकांना अनेक प्रकारचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते हे लक्षात घेऊन वेडिंग टुरिझम ट्रेंड अधिक रुळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Leave a Comment