धक्कादायक! नशेसाठी या देशातील लोक उकळुन पितात महिलांचे वापरलेले सॅनेटरी पॅड

pad
लोक नशा करण्यासाठी काय-काय करतील याचा नेम नाही. अनेकांनी नशेत स्वत:ला उध्वस्त करुन घेतले. कसल्या गोष्टींचे व्यसन माणसाला लागेल याबाबत काही सांगू शकत नाही. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्रग्स, दारु, गांजा यांचे सेवन नशा करण्यासाठी केले जाते हे तुम्ही ऐकलेच असेल. पण तुमचे डोके इंडोनेशियातील एका विचित्र नशेबद्दल ऐकल्यावर सुन्न पडेल. महिलांनी वापरलेले सॅनेटरी पॅड आणि लहान मुलांच्या डायपरला पाण्यात उकळवून या देशातील लोक त्याचे पाणी पितात.

सॅनेटरी पॅड आणि डायपरला पाण्यात उकळवून, लिक्विड बनवून येथील लोक त्याची नशा करत आहेत. या नशेच्या आहारी १३ ते १६ वर्षे वय असलेली मुलेही गेले आहेत. एका अहवालानुसार, हे उकळलेले पाणी पिणाऱ्यांवर विचित्र परिणाम होतात. हे लिक्विड पिल्यानंतर मुलांना हवेत उडण्याचा भास होतो. स्वत: हे एका १४ वर्षाच्या मुलाने स्विकारले आहे. या पाण्याला तो मुलगा दिवसातून तीन वेळा पितो. मीडिया रिपोर्टनुसार, पैशांच्या कमतरतेमुळे इंडोनेशियातील जे तरुण दारु किंवा सिगारेटची नशा करु शकत नाही. कचऱ्यात पडलेल्या सॅनेटरी पॅडला ते पाण्यात उकळून त्याची नशा करतात.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, सॅनेटरी पॅडमध्ये सोडियम पॉलीक्राइलेट असते. जे मासिकपाळीवेळी होणाऱ्या रक्तस्त्रावला शोषून घेते. लोकांना याचीच नशा होते. या पॅडला उकळवून जे नशा करतात त्यांच्यासाठी ही नशा प्राणघातक ठरू शकते.

Leave a Comment