सर्च करताना आता ‘गुगल’ वापरकर्त्यांना देता येणार प्रतिक्रिया

google
सॅन फ्रान्सिस्को – इंटरनेटवर शोध घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जाएंट सर्च इंजिन गुगलमध्ये मोठा बदल करता येणार आहे. वापरकर्त्यांना यामध्ये सर्च करताना आता प्रतिक्रिया देखील देता येणार आहेत.

अजून गुगल सर्चसाठी प्रतिक्रिया देण्याची सुविधा ऑनलाईन सुरू करण्यात आलेली नाही. पण याबाबतची माहिती गुगल हेल्पवर देण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर ज्याप्रमाणे प्रतिक्रिया देण्यासाठी वापर केला जातो, त्याप्रमाणे ही सुविधा असणार आहे.

इतरांचे कॉमेंटही लाईक अथवा डिसलाईकही वापरकर्त्यांना करता येणार आहेत. गुगलच्या धोरणाविरोधात असणाऱ्या प्रतिक्रिया दाखविल्या जाणार नसल्याचे गुगल हेल्प डॉक्युमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया नावासहित सर्वांना दिसणार आहेत. लॉग इन न करता प्रतिक्रिया देता येणार नाहीत. तसेच वापरकर्त्यांना प्रतिक्रिया काढून टाकण्याचीही सुविधा आहे.

Leave a Comment