महिलांना आजच्या आधुनिक युगातही अनेक देशांमध्ये प्राण्यांसारखी वागणूक दिली जाते. आपल्या स्वत: च्या अस्तित्वासाठी स्त्रियांना झगडावे लागते. या मानसिकतेतून काही देश बाहेर पडत आहेत. पण अशा देशांची यादी लहान नाही, जिथे महिलांना आजही रूढीपरंपरेच्या विळख्यात अडकवले आहे. आम्ही आपल्यासमोर अशाच एका देशाची धक्कादायक माहिती आणत आहोत.
नायजेरियामध्ये स्त्रियांसोबत दररोज केले जाते भयानक कृत्य
नायजेरियामध्ये स्त्रियांसोबत दररोज भयानक कृत्य केले जाते. अल्पवयीन मुलींना येथे कोंबड्या आणि बकऱ्यांसारखे गर्भवती केले जाते. लोकांची येथील तरूणींवर नजर असते. गर्भधारणा करण्यास १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना भाग पाडले जात आहे.
हा गोरखधंदा नायजेरियामध्ये प्रचंड प्रमाणात केला जातो. येथे ज्यांना मुले नसतात अशा लोकांना कमी वयाच्या मुली विकल्या जातात. या घृणास्पद कामाला बेबी फार्मिंग म्हणजेच मुलांची शेती असे म्हणतात. मुलींना गर्भवती झाल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात येते. या व्यतिरिक्त, ज्या मुली आजारी पडल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात त्यांचे अपहरण करून त्यांना देखील बळजबरीने गर्भवती केले जाते. गर्भवती झाल्यानंतर मुली गर्भपात करू शकत नाही. कारण तेथील कायदाच अशाप्रकारचा आहे.
गर्भपात नायजेरियामध्ये अवैध असल्यामुळे बेबी फार्मिंग आपले पाय पसरवत आहे. बेकायदेशीररित्या जन्माला आलेली मुले ५००० डॉलर्समध्ये विकली जातात तर तरूण मुली ४००० डॉलर्समध्ये विकल्या जातात. २०१५ नंतर या प्रकरणाबाबत अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर आवाज उठण्यात आला. पण कोणतीही सुनावणी आजपर्यंत झालेली नाही.