सर्वाधिक वेगवान कार हेनेसी व्हेनोम जीटी स्पायडर

venom
बुगाटी व्हेरोनचे सर्वाधिक वेगाचे रेकॉर्ड मागे टाकत अमेरिकन ऑटो कंपनी हेनेसीची हेनेसी व्हेनोम जीटी स्पायडर हि कार जगातील वेगवान कार बनली असून तिची नोंद गिनीज बुक मध्ये झाली आहे. या कारचा वेग ताशी ४२७.४ किमी नोंदला गेला असून भारतीय महामार्गांवरील वेग लक्षात घेतला तर हि कार तीन तासात मुंबई दिल्ली अंतर कापू शकेल असे सांगितले जात आहे.

या कारला ७.० लिटरचे ट्वीनटर्बो व्ही ८ इंजिन दिले गेले असून कारचे वजन आहे १२५० किलो. या कारची फक्त ३ युनिट बनविली गेली आहेत. हि कार ० ते १०० चा वेग २.४ सेकंदात घेते तर ० ते ३२१ किमीचा वेग घेण्यास तिला १३ पेक्षा कमी सेकंद लागतात. कंपनीने हि कार त्यांच्या २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सादर केली असून तिची एक्स शो रूम किंमत आहे १० कोटी रुपये. या अगोदरची सर्वात वेगवान कार बुगती व्हेरोन सुपरस्पोर्ट ताशी ४०८.८ किमी वेगाने धावणारी आहे.

Leave a Comment