अहमदाबादजवळ केवडिया येथे नर्मदा नदीच्या सरदार सरोवराजवळ उभारला गेलेला सरदार पटेल याचा जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यु ऑफ युनिटी अंतराळातूनही अगदी स्पष्ट दिसत असल्याचे फोटो अमेरिकन व्यावसायिक उपग्रह नेटवर्क प्लॅनेटने प्रसिद्ध केले आहेत. १५ नोव्हेंबरला काढलेले हे फोटो शुक्रवारी ट्विटरवर प्रसिद्ध केले गेले आहेत.
अंतराळातूनही स्पष्ट दिसतो स्टॅच्यु ऑफ युनिटी
यामुळे या स्मारकाची गणना पृथ्वीबाहेरून म्हणजे अंतराळातून दिसणारया मानवनिर्मित रचनेत झाली आहे. दुबईचे पाम आयलंड, चीनची भिंत, इजिप्त मधील गिजा पिरामिड याच्या यादीत आता स्टॅच्यु ऑफ युनिटी सामील झाला आहे.
अमेरिकन कंपनी स्कायलॅबने हे फोटो दिले आहेत. भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह अवकशात प्रक्षेपीत करण्याचे जे रेकॉर्ड नोंदविले त्यातील उपग्रह याच स्कायलॅब कंपनीचे होते.
स्टॅच्यु ऑफ युनिटी ७ किमी अंतरावरून दिसू शकतो. त्याच्या उभारणीसाठी ५ वर्षे लागली आहेत तरीही तो जगातील सर्वात कमी वेळात उभारला गेलेला सर्वाधिक उंच पुतळा असून त्यासाठी २९९० कोटी रु. खर्च केले गेले आहेत.