सोमवारी अंतराळात झेपावणार भारताचा पहिला खासगी उपग्रह

satelite
एका खासगी स्टार्टअप कंपनीने विकसित केलेला भारतातील पहिला देशांतर्गत खासगी उपग्रह सोमवारी अंतराळात झेपावणार आहे. कॅलिफोर्नियातील स्पेसएक्समधून 19 नोव्हेंबर रोजी हा उपग्रह अवकाशात झेप घेईल.

एक्सीडस्पेस असे या कंपनीचे नाव असून क्रिस नायर आणि अशर फरहान हे तिचे संस्थापक आहेत. अंतराळात उपग्रह पाठविणारी ती पहिली भारतीय कंपनी बनणार आहे. व्यावसायिक, सरकारी आणि शैक्षणिक ग्राहकांसाठी अंतराळ शोध सर्वसामान्यापर्यंत नेणे, हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी डेक्कन हेरॉल्ड वृत्तपत्राला सांगितले. एक्स्सीडसॅट 1 असे त्यांच्या उपग्रहाचे नाव आहे.

“हा उपग्रह खासगी रेडिओ ऑपरेटरसाठी एक पर्वणी ठरणार आहे. दळणवळण उपग्रहाची सर्व कार्ये हा उपग्रह करू शकणार आहे. यामुळे हॅम रेडिओला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून आपत्तींच्या वेळी देशाला मोठी मदत होणार आहे,” असे नायर यांनी सांगितले.

कॅलिफोर्नियातील वाँडेनबर्ग एअर फोर्स बेस येथून स्पेसएक्सच्या यानातून हा उपग्रह अंतराळात जाणार आहे. या यानावर 15 मायक्रोसॅट्स आणि 56 क्यूबसॅट्ससह 35 पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांचे उपग्रह असतील. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी, ब्राझिल आणि भारत यांसारख्या 18 देशांतील पेलोडचा त्यात समावेश आहे.

Leave a Comment