मराठा समाजाला आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे – छगन भुजबळ

chgan-bhujbal
नाशिक – मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांनी येत्या १ डिसेंबरला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन जल्लोषाला तयार रहा, असे सांगितले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यामुळे राजकीय प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झाली आहे. आमचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे, असे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

भुजबळांनी हे सूचक वक्तव्य नाशिकमध्ये केले आहे. आता ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण असून सर्वच राजकीय पक्षांचा या आरक्षणाबाबत पाठिंबा असल्याचेही भुजबळ म्हणाले. पण मराठा समाजाला आरक्षण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावे अशी भूमिका असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

गेली साडेतीन वर्ष मराठा क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन, मोर्चे करुन शासनाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. शासनाने याच दबावापोटी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करुन कायदेशीर आरक्षण देण्याची घोषणा करुन आयोग स्थापन केले. याच आयोगाने २ वर्षे मराठा समाजातील स्थिती पडताळून पाहणी केली. आयोगाने आरक्षणास मराठा समाज पात्र असल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे १ डिसेंबरला मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत काय निर्णय घेणार ह्या बाबत सर्वच मराठा बांधवांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment