ट्रायच्या कॉल ड्रॉप टेस्टमध्ये रिलायन्स जिओ उत्तीर्ण

Jio
नवी दिल्ली – कॉल ड्रॉप परीक्षण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) केले होते. रिलायन्स जिओने यामध्ये बाजी मारली आहे. या चाचणीत जिओच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही टेलिकॉम कंपनी उत्तीर्ण होऊ शकली नाही. ८ प्रमुख महामार्ग आणि ३ रेल्वे मार्गांवर २४ ऑगस्ट ते ४ ऑक्टोबरच्या दरम्यान ट्रायने ही टेस्ट घेतली होती.

जिओ महामार्गावर करण्यात आलेल्या परीक्षणामध्ये अव्वल राहिले. जेव्हा की अन्य टेलिकॉम कंपन्या या चाचणीत सपशेल अपयशी ठरल्या. सर्वात निराशाजनक स्थिती या टेस्टमध्ये बीएसएनएलची होती. तर एअरटेल, व्होडाफोन, आयडिया महामार्गावर घेण्यात आलेल्या चाचणीत अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. प्रयागराज (अलाहाबाद) ते गोरखपूर, दिल्ली ते मुंबई आणि जबलपूर ते सिंगरौल या रेल्वे मार्गांवरही टेस्ट घेण्यात आली. येथे नेटवर्क कव्हरेज आणि कॉल ड्रॉपची स्थिती अतिशय गंभीर होती. निश्चित करण्यात आलेल्या मानकांवर केवळ जिओ खरे उतरले.

जिओ कॉल ड्रॉप टेस्टच्या व्यतिरिक्त ४जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिले. जिओने ४जी डाउनलोड स्पीडमध्येही अन्य दूरसंचार कंपन्यांना मोठ्या फरकाने पिछाडीवर टाकले. हे आकडे ट्रायने प्रसिद्ध केले आहेत. गेल्या महिन्यात जिओची डाउनलोड स्पीड २०.६ एमबीपीएस होती. दुसऱ्या स्थानावर ९.५ एमबीपीएससह एअरटेल होते. तुलनेत जिओचा वेग एअरटेलच्या दुप्पट होता.

Leave a Comment