आमिर खान ‘मोगुल’, ‘महाभारत’ पुर्वी झळकणार या चित्रपटात

aamir-khan
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट प्रेक्षकांच्या एकंदर प्रतिसादावरुन निराशाजनक ठरला आहे. आमिर खान लवकरच आता दुसऱ्या एका प्रोजेक्टच्या तयारीला लागला आहे.

आमिर खान ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’नंतर ‘मोगुल’ आणि ‘महाभारत’ या चित्रपटात झळकणार अशी चर्चा सुरू आहे. पण या २ चित्रपटांपूर्वी आमिर ‘फॉरेस्ट गंप’ या इंग्रजी चित्रपटाच्या रिमेकवर काम करणार आहे. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक अदवित चंदन यांच्यासोबत आमिर खान या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. अदवित यांनी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता पुन्हा एकदा आमिरसोबत ते काम करणार आहेत. अदवित चंदन आणि आमिर खान यांनी ‘फॉरेस्ट गंप’च्या हिंदी रिमेकसाठी सर्व अधिकार खरेदी केले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक पाहता येईल. ‘फॉरेस्ट गंप’ हा अमेरिकन रोमॅन्टिक ड्रामा आहे. १९९४ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. लेखक विंस्टन ग्रूम यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.