यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी बँकातून काढले ५० हजार कोटी

cash
यंदाच्या दिवाळीत देशभरातील बँकामधून नागरिकांनी एकूण ५० हजार कोटी रुपये काढल्याचे रिझर्व बँकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालात म्हटले गेले आहे. ९ नोव्हेम्बर रोजी यंदा देशात करन्सी सर्क्युलेशन वाढून २०.२ लाख कोटींवर गेले होते त्यात दिवाळीचा वाटा ४९४१८ कोटी रुपये होता. यापूर्वी सर्वाधिक करन्सी सर्क्युलेशन १३ जानेवारी २०१७ ला नोंदले गेले होते.

देशात नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर झाल्यानंतर दरवर्षीच्या हिशोबाने करन्सी सर्क्युलेशन ५३ आठवडे निगेटिव्ह होते त्यात या वर्षीच्या मार्च पासून सुधारणा दिसून आली. तसेच एटीएम मधून रोख काढण्याच्या गतीतही वाढ दिसून आली. सध्या दरमहा सरासरी २.६ लाख कोटी एटीएम मधून काढले जात आहेत. बँकेतून रोख काढण्याचे प्रमाण वाढले कि बँकाना कर्जपुरवठा करण्यात अडचण येते व त्यामुळे व्याजदर वाढतात असे निरीक्षण नोंदविले गेले असले तरी दिवाळी नंतर बँकेत पुन्हा रोख रकमेचा भरणा वाढतो असा अनुभव आहे.

आता पाच राज्यात निवडणुका होणार आहेत. या काळातही करन्सी सर्क्युलेशन वाढते असे सांगितले जात आहे.

Leave a Comment