गुगल मॅपमध्ये आता करता येणार मेसेज

google
गेल्या १३ वर्षात गुगल मॅपने चांगलीच प्रगती केली असून मॅपची सेटलाईटच्या सहाय्याने सुविधा उपलब्ध करून दिल्याने लोकांना प्रवास करणे अधिक सोयीस्कर झाले आहे. दरवेळेस आपल्या युजर्सना काहीतरी नवीन देण्यासाठी गुगल नेहमीच प्रयत्न करत असते. गुगलने यावेळीही मॅपमध्ये नवीन फिचर आणायचे ठरवले आहे.

आपल्या मॅपमध्ये गुगल लवकरच टेक्स मेसेज फिचरचा समावेश करणार असल्यामुळे गुगल मॅपवर आता तुम्ही मेसेज करून संवाद साधू शकणार आहात. मेसेज सिस्टिम गुगल मॅपने एकत्रित केली आहे. लोकांनी गुगल मॅपच्या मदतीने व्यवसाय केले आहेत. हे फिचर त्यांच्यासाठी अधिक फायद्याचे असणार आहे. सध्या Android आणि IOS यांच्यासाठी गुगल मॅपचे मेसेज फिचर असेल. या महिन्यातील गुगल मॅपमध्ये होणारे पहिले अपडेट आहे. गुगल सतत नवीन फिचर्स घेऊन एक नवा प्लॅटफॉर्म युजर्सना देत असतो.

मॅपममधील मेसेजिंग फिचर सध्या काही देशांमध्ये सुरू होणार आहे. हे फिचर मुख्यत: फक्त मॅपच्या सहाय्याने व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. मॅपवर आलेला मेसेज स्वीकारण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Google My Bussiness App इंस्टॉल करावे लागेल. अशी माहिती गुगलचे प्रोडक्ट मॅनेजर आदित्य तेंडुलकर यांनी दिली आहे.

Leave a Comment