या बालाजी मंदिरात दूर केली जाते भूतबाधा

mehendi
भारतात अनके बालाजी मंदिरे आहेत मात्र राजस्थानातील दौसा जिल्यातील मेहंदीपूर येथे दोन डोंगरांच्या मध्ये असलेले मेहंदीपूर बालाजी मंदिर मात्र या सर्वांहून वेगळे आहे. येथे भूतप्रेताची लागण झालेल्याची बाधा दूर केली जाते आणि दररोज या मंदिरात अशी बाधा झालेले शेकडो लोक आणले जातात.

या मंदिरात प्रेतराज सरकार आणि भैरवबाबा म्हणजे कोतवाल कप्तान यांच्या मूर्ती आहेत. रोज दुपारी दोन वाजता कीर्तन होते आणि बाधा दूर केली जाते. येथील कोणताही प्रसाद खायचा नसतो, कुणाला द्यायचा नसतो आणि घरी न्यायचा नसतो. येथील बालाजी मूर्तीच्या छातीत डाव्या बाजूला एक चीर असून त्यातून सतत पाणी वाहते. याला बालाजीचा घाम म्हटले जाते. बालाजीला लाडूचा, प्रेतराज सरकारला तांदुळाचा तर भैरावाला उडीद याचा नैवेद्य दाखविला जातो. ज्यांना भूतप्रेताची बाधा आहे ते हा प्रसाद खातच विचित्र हालचाली करतात.

balaji
बालाजी समोर राम सीता याच्या मूर्ती असून हनुमान बालरूपात आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी एक आठवडा अगोदर लसून, कांदा, दारू, मांस, अंडी यांचे सेवन करायचे नाही असे बंधन आहे. येथे दोन प्रकारचा प्रसाद असतो. पहिला प्रसाद दरखास्त म्हणून तर दुसरा अर्जी म्हणून ओळखला जातो. पाहिला प्रसाद दोन वेळा खरेदी करायचा तर अर्जी मध्ये तीन ताटात प्रसाद असतो. पहिला प्रसाद चढविला कि त्वरित मंदिरा बाहेर पडायचे असते तर दुसरा प्रसाद मंदिरातून बाहेर पडताना मागे फेकायचा आणि वळून न पाहता बाहेर पडायचे अशी रीत आहे.

Leave a Comment