अॅक्वोस आर २, दोन नॉचवाला पहिला स्मार्टफोन लाँच

aquous
जपानी कंपनी शार्पने नवा स्मार्टफोन अॅक्वोस आर २ नुकताच सादर केला असून हा जगातील पहिला दोन नॉच असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. या फोनच्या हँडसेटच्या वरील बाजूला आणि खालील बाजूला अश्या दोन नॉच आहेत. पैकी टॉप नॉचमध्ये ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे तर बॉटम नॉच मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

या फोनला ५.२ इंची फुल एचडी डिस्प्ले, ड्युअल सीम, अँड्राईड ९.० पाय ओएस, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. रिअरला २२.६ एमपीचा कॅमेरा असून स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर आहे. हा फोन डीप व्हाईट, प्युअर ब्लॅक, स्मोकी ग्रीन रंगत उपलब्ध आहे. या फोनची किंमत आहे २४९९० रुपये.

Leave a Comment