आतापर्यंतच्या सर्वात वजनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

isro
हैदराबाद – संचार उपग्रह ‘जीसॅट-२९’चे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्रप्रदेशच्या सतिश धवन अवकाश केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. ३ हजार ४२३ किलो एवढे या उपग्रहाचे वजन असून हा आतापर्यंतचा सर्वात वजनी उपग्रह आहे.

जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेकल (जीएसएलव्ही) मॉक-३ च्या मदतीने या उपग्रहाला अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. जीसॅट-२९ हा उपग्रह वजनी असल्यामुळे त्याला जगातील सर्वात शक्तिशाली बुस्टर एस-२०० च्या मदतीने प्रक्षेपित करावे लागले. या उपग्रहामुळे जम्मू-काश्मीरसोबतच उत्तर-पूर्व राज्यांमध्ये संचार क्षेत्रात मदत होणार आहे. जीसॅट-२९ उपग्रह उच्च क्षमतेच्या Ka/Ku-Band (रेडिओ फ्रिक्वेंसी) ने सज्ज आहे. या उपग्रहात सतत १० वर्षे काम करण्याची क्षमता आहे. या उपग्रहामुळे दूरवरच्या प्रदेशात संचार करणे सोपे होणार आहे. जीसॅट-२९च्या प्रक्षेपणामुळे भविष्यात आत्याधुनिक उपग्रह अवकाशात सोडण्यास मदत होईल.

Leave a Comment