नेताजींच्या सन्मानार्थ काढले जातेय ७५ रु. चे विशेष नाणे

netaji
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ मोदी सरकार ७५ रु. मूल्याचे विशेष नाणे प्रकाशित करणार आहे. या संदर्भातील घोषणा मंगळवारी करण्यात आली. नेताजीने अंदमान मधील पोर्ट ब्लेअर येथे पहिला तिरंगा फडकाविला होता त्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नाणे प्रकाशित केले जाणार आहे. ३० डिसेंबर १९४३ साली पोर्ट ब्लेअर येथील सेल्युलर जेलसमोर नेताजींनी पहिला तिरंगा फडकविला होता.

या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असून त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि ५-५ टक्के निकेल आणि जस्त आहे. या नाण्यावर नेताजी यांची प्रतिमा सेल्युलर जेलच्या पार्श्वभूमीवर ध्वजाला सलाम करताना कोरली गेली आहे. त्यावर देवनागरी आणि इंग्रजी भाषेत पहिला तिरंगा फडकविण्याचा दिवस असा मजकूर कोरला आहे.

२१ ऑक्टोबरला पंतप्रधान मोडी यांनी नेताजींच्या सन्मानार्थ दिल्लीच्या लाल किल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकविला होता.

Leave a Comment