कर्जत येथे बनतेय अंबानींची वादग्रस्त जिओ इंस्टीटयूट

ambani
रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड १० हजार कोटी रुपये गुंतवून उभारणार असलेली आणि तयार होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली जिओ इंस्टीटयूट महाराष्ट्राच्या रायगड जिल्यातील कर्जत येथे उभारली जात असून त्यासाठी ८०० एकर जागा घेतली गेली असून तेथे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. रिलायंस फौंडेशन या इंस्टीटयूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालन करणार आहे. या संस्थेत मेडिसिन, आर्ट, क्रीडा विषयातील शिक्षण दिले जाणार आहे.

मोदी सरकारने ग्रीन फिल्ड श्रेणी देण्यासाठी देशभरातून प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांकडून अर्ज मागविले होते. त्यात या संस्थेला हि श्रेणी दिली गेली मात्र हि संस्था अजून बांधून तयार नसतानाहि अन्य योग्य संस्थाना डावलून तिला हा दर्जा दिला गेल्याने वादविवाद सुरु झाला होता व यामुळे हि संस्था सुरु होण्याअगोदर वादग्रस्त ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुकेश व नीता अंबानी या संस्थेचे पहिले गव्हर्निग सदस्य बनणार असून त्यांची कन्या इशा व्यवस्थापक म्हणून काम बघणार आहे. २०११ मध्ये रिलायंसच्या वार्षिक सार्वजनिक सभेत मुकेश यांनी या संस्था उभारणीची घोषणा केली होती आणि त्यासाठी ५०० कोटी रु. गुंतवून रिलायंस फौंडेशन स्थापन केले जात असल्याचेही जाहीर केले होते. या संस्थेला ग्रीन फिल्ड श्रेणी दिल्यामुळे तिला १ हजार कोटींचे विशेष अनुदान मिळणार आहे.

Leave a Comment