बुलेट ट्रेनच्या वेगाने धावते ही बाईक, किंमत ३५ कोटी

dodge
जगभरात बाईकप्रेमिंची संख्या लाखोंच्या घरात असेल. कुठे, कोणत्या, कश्या बाईक वापरत आहेत याची माहिती मिळविणे त्यामुळे त्यांना आवडते. जगात सर्वाधिक वेगाने धावणारी बाईक म्हणून डॉज टॉमहॉक प्रसिद्ध असून या बाईकचा वेग नुसता पहिला तरी घाम फुटेल असा दावा केला जातो. हि बाईक बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने धावते. तिचा वेग आहे ताशी ६७२ किमी.

अर्थात ही बाईक घेणे कुणाही ऐरयागैरयाला परवडणारे नाही कारण तिची किंमत आहे ३५ कोटी रुपये. जगात फक्त ९ जणांकडे हि बाईक आहे. १५ वर्षापूर्वी या बाईकला नॉनस्ट्रीट लीगल कॉन्सेप्ट म्हणून बाजारात आणले गेले होते. या बाईकला ८.३ लिटरचे व्ही १० एसटीआर वायपर इंजिन दिले गेले असून ती दोन सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेते. २००३ साली ती नॉर्थ अमेरिकेत इंटरनॅशनल ऑटोशो मध्ये सादर केली गेली तेव्हाच तिचे डिझाईन आकर्षणाचे केंद्र बनले होते. या बाईकला पुढे आणि मागे दोन दोन अशी चार चाके आहेत.

Leave a Comment