येतेय जगातील अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रिक बाईक

eicma
बाईक प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. इटलीमधील मिलान शहरात सुरु असलेल्या इआयसीएमए २०१८ मध्ये ब्रिटीश ऑटो कंपनी आर्क व्हेईकलने नवी इलेक्ट्रिक बाईक सादर केली असून हि जगातील सर्वात प्रीमियम आणि अॅडव्हान्स्ड इलेक्ट्रिक बाईक असल्याचा दावा केला आहे. आर्ट व्हेक्टर या नावाने हि बाईक सादर केली गेली आहे. या बाईकची किंमत आहे ८५ लाख रुपये.

या बाईकला सॅमसंगची १६.८ किलोवॅटची, ३० मिनिटात फुल चार्ज होणारी बॅटरी दिली गेली आहे. हि बाईक एकदा चार्ज केली कि २२५ मैल म्हणजे ३६० किमी जाऊ शकते. हि बाईक ० ते १०० किमीचा वेग ३.१ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे तशी २०० किमी.

हि बाईक पूर्ण हँडमेड असून ती बनविताना कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. बाईकचे वजन २२० किलो असून खास अॅक्सेसरिज दिल्या गेल्या आहेत. त्यात स्पेशल हेल्मेट आणि जॅकेटचा समावेश आहे. एचयुडी हेल्मेट किलेस इग्निशन फॉबसह आहे. त्यात रिअर व्हिजन सिस्टीम दिली गेली असून छोट्या स्क्रीनवर रिअर व्ह्यू डिस्प्ले पाहता येतो. जॅकेट पूर्णपणे इलेक्ट्रिकली कनेक्टेड आहे आणि ते तीन मोड मध्ये काम करते. पहिल्या अर्बन मोड मध्ये रायडरला ब्लाइंड स्पॉटमध्ये असलेल्या वाहनाची सूचना दिली जाते. दुसरा सपोर्ट मोड रायडरचे डायनामिक पोझिशन सांगतो तर तिसरा युफोरिक मोड हेल्मेट आणि बाईकची माहिती रायडरला देतो.

Leave a Comment