दुर्मिळ आणि अमूल्य पिंक लीगसी डायमंडचा लिलाव

diamond
मंगळवारी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथे जगातील अतिशय दुर्मिळ आणि अमूल्य अश्या १९ कॅरेटच्या पिंक लीगसी नावाने प्रसिद्ध असलेल्या हिऱ्याचा लिलाव पुकारला गेला असून हा हिऱ्याला ५ कोटी डॉलर्स म्हणजे ३.६३ अब्ज रुपये इतकी विक्रमी किंमत मिळेल असा दावा केला गेला आहे. या किमतीला हा हिरा विकला गेला तर तो जगातील सर्वाधिक बोली लागलेला हिरा ठरणार आहे.

हा हिरा डीबीअर्स मायनिंग कंपनीचे मालक ओपनहायमर याच्या मालकीचा होता मात्र सध्या तो कुणाकडे होता हि माहिती उघड केली गेलेली नाही. क्रिस्टीन या लिलाव कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा जगातील सर्वोत्तम आयताकार हिरा आहे. आजपर्यंत १० कॅरेटपेक्षा अधिक वजनाचे चार गुलाबी हिरे लिलावात विकले गेले आहेत. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये १५ कॅरेटचा एक गुलाबी हिरा हाँगकाँग येथे ३२.५ दशलक्ष डॉलर्सना विकला गेला होता.

सध्या लिलावासाठी आलेला पिंक लीगसी हिरा १०० वर्षापूर्वी द. आफ्रिकेतील खाणीत सापडला होता असे सांगितले जात आहे.

Leave a Comment