स्टँडर्ड १ किलो वजन परिमाण १२९ वर्षानंतर प्रथमच बदलणार

measure
१२९ वर्षापूर्वी बनविली गेलेली १ किलो वजनाची परिमाणे आता प्रथमच अपग्रेड केली जाणार आहेत. आत्तापर्यंत जगभरात आदर्श मानले जाणारे हे १ किलोचे आदर्श वजन फ्रांसमध्ये एका काचेच्या बॉक्स मध्ये ठेवले गेले असून तो टेनिस बॉलच्या उंचीचा एक सिलिंडर आकाराचा तुकडा आहे. त्याला ग्रँड असे म्हटले जाते. आता अमेरिकन नॅशनल इंस्टीटयूट ऑफ स्टँडर्ड अँड टेकनॉलॉजी नवा फॉर्म्युला तयार करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४३ वर्षापूर्वी १७ देशांनी फ्रांसमध्ये इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट मेजर्सची स्थापना केली. त्यात विविध परीमाणासाठी ७ मानके तयार केली गेली. लांबी साठी मीटर, वजनासाठी किलो, वेळेसाठी सेकंद, करंट साठी अँपियर, तपामानासाठी केल्विन, पदार्थासाठी मोल, प्रकाशाच्या तीव्रतेसाठी कॅडेला यांचा समावेश होता. यात १८८९ मध्ये आदर्श किलो वजन ग्रँड के नावाने तयार केले गेले. अन्य सहा परिमाणे स्थिर फॉर्म्युला तयार करून बदलली गेली मात्र किलोमध्ये बदल झाला नव्हता.

फ्रांसमधील या वजनी परिमाणावर कडक नजर आणि सुरक्षा असूनही त्याचा धोका निर्माण झाला होता कारण हे परिमाण नष्ट झाले तर मानवी संस्कृतीच्या अचूक गणनेसाठी काही उपाय नसेल अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता नवीन फॉर्म्युला तयार केला गेला आहे. फ्रांस मधील १ किलो आदर्श वजनाच्या सिलिंडरसाठी जी काचेची बॉक्स आहे त्याला तीन किल्ल्या केल्या गेल्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या गुप्त जागी ठेवल्या गेल्या असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment