लैंगिक शोषण आरोपावरून फ्लिपकार्टच्या बिन्नी बन्सल यांचा राजीनामा

binny
फ्लिपकार्ट या इ कॉमर्स कंपनीचे सीइओ आणि सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषण आरोपावरून आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो स्वीकारला गेला असल्याचे समजते. अर्थात राजीनामा देताना बिन्नी यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळले असून हा काळ ते व त्यांच्या कुटुंबाची परीक्षा पाहणारा असल्याचे पत्र कंपनीतील सहकाऱ्यांना लिहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी फ्लिपकार्ट कंपनीत काम करत असलेल्या एका महिलेने बन्सल याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप जुलै महिन्यात केला होता. हि महिला सध्या या कंपनीत काम करत नाही. आरोपानंतर केल्या गेलेल्या तपासात आरोपांची पुष्टी होऊ शकलेली नसली तरी बिन्नी यांच्याकडून या संदर्भात पारदर्शकता दाखविली गेली नाही असे समजते. रॉयटरच्या बातमीनुसार बिन्नी यांनी मेल अथवा फोनला उत्तर दिले नाही.

बिन्नी यांनी मात्र लैंगिक शोषणाचे आरोप पूर्ण खोटे असल्याचा दावा करताना म्हटले आहे कि वॉलमार्ट बरोबर सौदा झाल्यानंतर फ्लिपकार्टच्या ऑपरेटिंग सेल मधून वेगळे होणाच्या विचार सुरु होताच मात्र व्यक्तिगत घटना घडल्याने राजीनामा देण्याची वेळ लवकर आली. याचा कंपनी आणि माझ्या टीमवर कोणताची वाईट परिणाम होऊ नये अशी इच्छा आहे.

Leave a Comment