उर्जित पटेलांनी घेतली पंतप्रधानांची भेट

combo
नवी दिल्ली – विविध मुद्द्यावरुन भारतीय रिझर्व्ह बँक व केंद्र सरकारमध्ये संबध ताणलेले असल्याच्या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गव्हर्नर उर्जित पटेल यांनी शुक्रवारी (९ नोव्हेंबर) भेट घेतली. तसेच पटेल यांनी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांचीही भेट घेत मतभेदाबाबत तोडगा काढण्यावर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत सुत्राच्या माहितीनुसार आरबीआयने लघु व मध्यम उद्योगांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. संकटात सापडलेल्या बिगर वित्तीय संस्थांना कर्जपुरवठा करण्याबाबत आणि राखीव निधी वर्ग करण्याबाबत आरबीआयची भूमिका मात्र स्पष्ट झालेली नाही. आरबीआयच्या बोर्डाची बैठक येत्या १९ नोव्हेंबरला पार पडत आहे. सरकारचे प्रतिनिधी आणि स्वंतत्र संचालक सरकारच्या मागण्यांबाबत या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Leave a Comment