ओडिशामध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार रिलायन्स इंडस्ट्रीज

mukesh-ambani
भुवनेश्वर – ओडिशामध्ये ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. त्यांनी ही घोषणा ओडिशा सरकारने गुंतवणुकदारांसाठी आयोजित केलेल्या ‘मेक इन ओडिशा इन्कलेव्ह’मध्ये केली.

यावेळी मुकशे अंबानी म्हणाले, की सर्वाधिक गुंतवणुकदारांची संख्या असलेली रिलायन्स ही कंपनी आहे. ओडिशामध्ये येत्या ३ वर्षात ३ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जीओ नेटवर्कच्या व्यवसायात ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. पुढे ते म्हणाले, की जीओ नेटवर्कची मोहीम ओडिशा-भारताचे परिवर्तन करण्यासाठी आहे.

त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या ३० हजार नव्या रोजगारांची निर्मिती केल्याचा दावा केला. प्रत्येकाला जोडण्यासाठी आणि प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी आम्ही उच्च दर्जाची माफक किंमतीत सेवा देत आहोत. ओडिशाचे डिजीटल भविष्य पुढे नेण्यासाठी रिलायन्स ग्रुप मदत करणार असल्याचे अंबानी यावेळी म्हणाले.

जीओ सेवेची गेल्या २ वर्षापूर्वी सुरुवात झाल्यानंतर मोबाईल डाटा वापर करण्यात भारताचा १५५ व्या क्रमांकावरुन थेट पहिल्या क्रमांक आला आहे. जीओगिगा फायबर या ब्राँडब्रँड सेवेतून घर आणि परिसराला जोडण्याची रिलायन्सची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ब्राँडब्रँडच्या वापरात भारताचा १३५ व्या क्रमांकावरुन जगातील पहिल्या तीनमध्ये क्रमांक करण्याचे रिलायन्सचे ध्येय आहे. हे ध्येय येत्या ३ वर्षात पूर्ण करू, असा अंबानी यांनी विश्वास व्यक्त केला. रिलायन्सने गेल्या काही वर्षात ओडिशामध्ये ६ हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे.

Leave a Comment