आजपासून धावणार ‘श्री रामायण एक्सप्रेस’

ramayan-express
नवी दिल्ली – भारतीय रेल्वे धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी रामायणाशी संबंधित महत्त्वाच्या आणि तीर्थस्थळांना जोडणारी विशेष ट्रेन सुरू करत असून या ट्रेनचे नाव ‘श्री रामायण एक्सप्रेस’ असे ठेवण्यात आले आहे. ही ट्रेन आजपासून दिल्लीहून धावणार आहे.

श्री रामायण एक्सप्रेसविषयीची माहिती रेल्वे मंत्रालयाने सोमवारी दिली. अशा प्रकारची ट्रेन सुरू करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती. १६ दिवसांमध्ये ही ट्रेन श्रीरामाशी संबंधित सर्व ठिकाणे आणि तीर्थस्थळांची यात्रा पूर्ण करेल. या तीर्थस्थळांच्या यात्रेत भारतासह श्रीलंकेतील ठिकाणांचाही समावेश आहे. श्रीलंकेतील ठिकाणांना भेट देऊ इच्छिणाऱ्यांना चेन्नईपासून कोलंबोला जाणारे विमान पकडावे लागणार आहे. यासाठी आयआरसीटीसी वेगळी रक्कम आकारणार आहे.

या यात्रेचे आकार प्रत्येकी १५ हजार १२० रुपये असेल. यामध्ये नंदीग्राम, सीतामढी, जनकपपूर, वाराणसी, प्रयाग, श्रिंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम् या ठिकाणांचा समावेश असेल. यामध्ये रेल्वेकडून प्रवाशांचा राहणे, जेवण आदी सर्व खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय ५ दिवस, ६ रात्रींच्या श्रीलंका पॅकेजमध्ये कँडी, नुवारा, इलिया, कोलंबो आणि नेगोम्बो आदी ठिकाणांचा समावेश असेल. यासाठी प्रत्येकी ३६ हजार ९७० रुपये खर्च येईल.

Leave a Comment