युएसएफडीएकडून एड्सबाधितांच्या डोळ्यांसाठी सिप्लाच्या अँटी व्हायरल इनफेक्शन औषधाला मंजुरी

cipla
नवी दिल्ली – सिप्लाला नव्या औषधाचे उत्पादन करण्यास अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अंतिम मंजूरी दिली आहे. हे औषध म्हणजे वाल्गॅनिकिक्लोव्हर (Valganciclovir) गोळ्या आहेत. एड्सबाधित रुग्णाच्या डोळ्यांना विषाणुंचा संसर्ग होऊ नये, यासाठी त्यांचा वापर केला जातो.

सिप्लाला वाल्गॅनिकिक्लोव्हरच्या ४५० मिलीग्रॅम मात्राच्या गोळ्या उत्पादन करण्यास अमेरिकेच्या अन्न आणि औषधी प्रशासनाने (युएसएफडीए) मंजुरी दिली आहे. सिप्ला कंपनीने मुंबई शेअर बाजाराला याबाबतची माहिती दिली आहे. स्पटेंबर २०१८ पर्यंत एकूण १२ महिन्यात ७.९ कोटी डॉलरचा सिप्लाने व्यवसाय केला. अमेरिकेच्या औषध व प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर सिप्लाच्या शेअरमध्ये १.०९ टक्के वधारले आहेत.

Leave a Comment