सॅमसंगचा डब्ल्यू २०१९ फ्लिप स्मार्टफोन लाँच

w2019
सॅमसंगने त्यांचा डब्ल्यू २०१९ हा नवा फ्लिप स्मार्टफोन लाँच केला असून हा फोन डब्ल्यू २०१८ चे अपग्रेड व्हर्जन आहे. हि गोल्ड एक्स्ट्रीम प्लॅटीनम गोल्डन कलेक्टर एडिशन आहे. या फोनची सुरवातीची किंमत १ लाख ८१ हजार आहे.

हा फोन दोन व्हर्जन मध्ये असून त्याला ४.२ इंची दोन फुल एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले दिले गेले आहेत. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ ऑक्टाकोर चीप्सेत, अँड्राईड ८.१ ओरिओ ओएस, १२ एमपीचे दोन रिअर कॅमेरे, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, अशी त्याची अन्य फिचर आहेत. हा फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी तसेच २५६ जीबी स्टोरेज सह उपलब्ध केला गेला असून फोनची मेमरी ५१६ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.

Leave a Comment