जगातील सर्वाधिक लांबीच्या समुद्रीपुलावर मिळणार ५ जी नेटवर्क

seabrid
हाँगकाँग झुआई आणि मकाऊ यांना जोडणाऱ्या चीनने उभारलेल्या जगातील सर्वाधिक लांबीच्या समुद्र पुलावर लवकरच ५ जी नेटवर्क उपलब्ध केले जाणार आहे. ५५ किमी लांबीच्या या पुलावर सध्या ४ जी नेटवर्कला चांगले कव्हरेज मिळत आहे. जीटीपी कॉर्पच्या डब्ल्यूएलएएन कार्यालयातील अधिकारी आणि पूल नेटवर्कचे संचालक फांग डेन यांनी रविवारी हि घोषणा केली.

फांग म्हणाले आमच्या तज्ञ आणि कर्मचारी वर्गाने ऑप्टीकल फायबरची कक्षा २० किमीने वाढविली आहे. त्यासाठी या पुलावर पूर्ण नेटवर्क मिळू शकेल असे सिग्नल सुनिश्चित केले गेले आहेत. लवकरच येथे ५ जी नेटवर्क सेवा मिळू शकेल आणि युजर पुलावरून जाताना इंटरनेटचा वापर करू शकतील. गेल्या महिन्यात या पुलाचे उद्घाटन झाले असून त्यामुळे वरील अंतराच्या प्रवासाला लागणारा ४ तासांचा वेळ आता अर्ध्या तासावर आला आहे.

Leave a Comment