फेसबुकनेही लाँच केले व्हिडिओ आणि म्युझिक अॅप

facebook
सॅन फ्रान्सिस्को – एक नवीन अॅप सोशल मीडियातील अग्रगण्य कंपनी फेसबुकने लाँच केले असून हे एक व्हिडिओ अॅप असून वापरकर्त्याला यात लहान स्वरुपाचे व्हिडिओ विविध वैशिष्टपूर्ण फीचर्सच्या साहाय्याने शेअर करता येणार आहेत.

हे अॅप सध्या अमेरिकेत उपलब्ध असल्याची माहिती फेसबुकचे उत्पादन व्यवस्थापक अॅण्डी हॉन्ग यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. व्हिडिओ एडिटिंग टूल्स या अॅपमध्ये असून वापकर्त्याला व्हिडिओत टेक्स्ट आणि संगीतही समाविष्ट करता येईल. लॅस्सो हे एक मनोरंजक आणि छोट्या स्वरुपाच्या व्हिडिओसाठी एकमेव अॅप आहे. तसेच सर्व व्हिडिओ हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याची सुविधाही यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

एका अहवालानुसार, अमेरिकेत फेसबुकपेक्षा युट्युब, स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे युट्युब, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया कंपनींशी स्पर्धा करण्यासाठी हे अॅप अमेरिकी वापरकर्त्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे अॅप आयओएस आणि अॅन्ड्रॉइड या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध होणार आहे. मात्र, अमेरिकेशिवाय इतर देशांमध्ये हे अॅप कधी लाँन्च होते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Leave a Comment