मुख्यमंत्र्यांची युतीबाबत कोपरखळी; भाजपवर शिवसेना लपून प्रेम करते

devendra-fadanvis
नागपूर – दिवसेंदिवस ‘तुझे माझे जमेना आणि तुझ्या शिवाय करमेना’ अशी काहीशी परिस्थिती असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील कलगीतुरा वाढतच आहे. पुढील निवडणुकीला स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेसोबतच सामोरे जाणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भाजप शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंजारण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. भाजपच्या हाकेला शिवसेना ‘ओ’ देत नसली तरी भाजपने प्रयत्न मात्र सोडलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत शिवसेनेसोबत युती होईल असा आशावाद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेवरील आमचे प्रेम आम्ही जगासमोर उघड केले आहे. आमच्यावर शिवसेनेचेदेखील प्रेम आहे. पण त्यांचे प्रेम लपून असल्याची कोपरखळी मुख्यमंत्र्यांनी हाणली आहे. ते शहरातील आयोजित दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेत बोलत होते. भाजप आणि शिवेसनेची युती आगामी निवडणुकीत होणार की तुटणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment