अलिबाबाची पाच मिनिटात ३ बिलियन डॉलरची कमाई

alibaba
शांघाई – आपल्या महासेलमध्ये ५ मिनिटात चीनमधील आघाडीची इ- कॉमर्स कंपनी अलिबाबाने तब्बल ३ बिलियन डॉलरची उलाढाल केली आहे. जगभरात अलिबाबाचा रविवारी एका दिवसाचा वार्षिक महासेल चालू आहे. हा विक्रम या सेलच्या पहिल्या पाच मिनिटातच खरेदीचा झाला आहे. तर तब्बल १० बिलियन डॉलरची खरेदी पहिल्या तासाभरात अलिबाबाच्या ग्राहकांनी केली आहे.

या सेलमध्ये अॅपल, शाओमी या कंपनींच्या उत्पादनांना प्रचंड मागणी आहे. अलिबाबाने मागच्या वर्षीच्या महासेलमध्ये एका दिवसात २५ बिलियन डॉलरची विक्री केली होती. यावर्षी हा विक्रम आरामात मोडला जाईल, अशी चिन्हे आहेत. अलिबाबा कंपनीचे प्रमुख जॅक मा हे या महासेलच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. या सेलमध्ये लहान मुलांच्या डायपरपासून मोबाईलपर्यंतच्या सर्व वस्तूंवर लोक तुटून पडले आहेत. लॉस अँजेलिस, टोकियो, फ्रँकफर्ट या जगातील शहरांध्ये या सेलमधून विक्रमी विक्री झाली आहे.

Leave a Comment