नियमभंग केल्याप्रकरणी रिलायन्सला भरावा लागला ६२ लाखांचा दंड

sebi
नवी दिल्ली – सेबीने रिलायन्स कम्युनिकेशन्सवर क्रेडिट कार्ड एजन्सीसह डेबेंचर ट्रस्टींना असहकार्य केल्याचा दावा केला होता. रिलायन्स कम्युनिकेशन्सने नियमभंग केल्याचा प्रकार घडल्यानंतर ६२. ४ लाख रुपयांचा दंड भरला आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून रोख्यांवरील व्याज इत्यादीबाबत माहिती देण्यात आली नव्हती, असे सेबीने म्हटले आहे. यावर तोडगा म्हणून कंपनीने दंड भरला आहे. अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन्स ही कंपनी आहे. सेबीची स्थापना गुंतवणूकदारांचे हितसंबंध जपत त्यांना संरक्षण देण्यासाठी प्राइस रिगिंग, इनसायडर ट्रेडिंग, अयोग्य आणि फसव्या व्यापारी प्रथा यांना प्रतिबंध घालण्यासाठी करण्यात आली आहे.

Leave a Comment