फ्लिपकार्टसह अॅमेझॉनला स्पर्धा आयोगाकडून दिलासा

combo
नवी दिल्ली – अॅमेझॉन व फ्लिपकार्ट कंपन्यांचा ई-कॉमर्स व्यवसायात दबदबा निर्माण होत असून बाजारात वर्चस्व या कंपन्या तयार करत असल्याची तक्रार ऑनलाईन व्हेंडर ग्रुपने भारतीय स्पर्धा आयोगाकडे (सीसीआय) केली. पण सीसीआयने तक्रारकर्त्याचा दावा फेटाळून लावला आहे.

उचित व्यापारासाठी वॉचडॉग म्हणून भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) ही काम करते. सीसीआयने आदेशात म्हटले आहे की, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनकडून करण्यात येणाऱ्या व्यापाऱ्याच्या पद्धती या स्पर्धात्मक नियमांचे उल्लंघन करत नाहीत. तसेच कंपन्या बाजारात वर्चस्व करत असल्याची तक्रारही सीसीआयने फेटाळली आहे.

नव्या ऑनलाईन बाजारपेठ ही उदयाने येत असून त्याची योग्य रचना होणे आवश्यक आहे. नव्या संशोधनाला मोकळीक घेता येणे गरजेचे आहे. ऑनलाईन बाजारपेठेची वृद्धीची क्षमता आणि ग्राहकांचे हित लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बाजारपेठेत हस्तक्षेप घेताना काळजीची गरज आहे, असे सीसीआयने आदेशात म्हटले आहे. तक्रारकर्त्या ऑल इंडिया ऑनलाईन व्हेंडर असोसिएशनचे देशात २ हजारांहून अधिक सदस्य आहेत.

Leave a Comment