कॅनडासह थायलंडमध्ये फेसबुकच्या डेटिंग अॅपची सुरुवात

facebook
सॅन फ्रान्सिस्को – आपल्या व्यवसाय विस्तारासाठी फेसबुक सातत्याने प्रयत्न करत आहे. फेसबुकने व्हिडिओ कॉलिंगनंतर डेटिंग अॅपच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. थायलंड आणि कॅनडामध्ये ‘फेसबुक डेटिंग’अॅपची चाचणी घेण्यात आली आहे.

जगभरातील युवा वर्गाच्या पंसतीस टिंडर आणि बंबल हे डेटिंग अॅप उतरले आहेत. फेसबुकने याच अॅपप्रमाणे डेटिंगची सेवा प्रथम कोलंबियात सप्टेंबरमध्ये सुरू केली. विविध ग्रुपमध्ये संवाद आणि इव्हेंटचा यामध्ये पर्याय आहे. त्यातून लोकांना एकत्रित भेटण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.

नवीन सुविधा कॅनडा आणि थायलंडमधील फेसबुक डेटिंगअॅपमध्ये दिल्या आहेत. ‘सेकंड लुक’चा पर्याय यामध्ये दिला आहे. त्यानुसार वापरकर्त्याला डेटिंग करताना दुसऱ्यांदा प्रोफाईल पाहता येणार आहेत. या सुविधेमुळे फेसबुक डेटिंग अॅपचा जास्तीत जास्त वापर होईल, असा विश्वास फेसबुकने केला आहे. हे अॅप फक्त प्रौढांना मोफत आणि विनाजाहिराती वापरता येते.

Leave a Comment