२ रुपयांनी महागला गॅस सिलिंडर

gas
नवी दिल्ली – एलपीजी वितरकांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिश्यातून वसूल करण्याचे ठरविले असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका देत अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर आज दोन रुपयांनी महागला. या दरवाढीनंतर १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत ५०५.०५ रुपये झाली आहे. ही दरवाढ गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा झाली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जूनपासून दर महिन्याला वाढ होत आहे. जीएसटी आणि एकूण किंमतीत १६.२१ रुपयांची वाढ ही यामागची कारणे सांगून सरकारने दरवाढ केली होती. त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरात आज केलेली दरवाढ ही दुसऱ्यांदा केलेली दरवाढ आहे. वितरकांचे कमिशन १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ४८.९८ रुपये आणि ५ किलोच्या सिलिंडरसाठी २४.२० रुपये होते. आजपासून या दराऐवजी ५०.५८ आणि २५.२९ रुपये आकारले जातील.

Leave a Comment