येथील आदिवासी मनुष्यालाही ठार मारुन खातात

amazon
पीरान्हा प्रजातीच्या मासळ्या अॅमेझॉनच्या परिसरात असलेल्या पाण्यात आढळून येतात. एक चित्रपटही यावर आला आहे. पण इतरही काही अशा बाबी येथे आढळून येतात, की ज्या अगदी विचित्र आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल वाचल्यावर आश्चर्याचा धक्का बसेल.

५० लाख वर्गमीटर परिसरात साऊथ अमेरिकेतील अॅमेझॉनचे जंगल पसरले आहे. हे जंगल ब्राझिल, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वाडोर, फ्रेंच, गुआना, पेरु, सुरीनाम आणि व्हेनेजुएला या देशांच्या सीमाभागात आहे. अशा काही बाबी या जंगलात आढळून येतात ज्यांच्याबाबत तुम्ही कधी ऐकले किंवा कल्पना देखील केली नसेल.

प्रचंड क्रूर असे येथील आदिवासी आहेत. त्यांच्या परिसरात एखादा संशोधक गेला तर त्याला ठार मारुन ते त्याचे मांस खातात. त्यानंतर त्याची खोपडी घरासमोर अडकवतात. ब्राझिलच्या या जंगलात २००९ मध्ये १९ वर्षांचा एक संशोधक Ocelio Alves de Carvalho आदिवासींमध्ये अडकला होता. त्यांनी त्याला ठार मारले होते.

Leave a Comment