५० लाखांपेक्षा जास्त अकलूज बाजारातील या घोड्यांची किंमत

horse
पंढरपूर : अकलूजमध्ये सध्या विक्रमी घोडेबाजार भरला असून देशातील अत्यंत उच्च प्रतीचे जातिवंत अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. ५० लाखापेक्षा जास्त किमती असणारे तब्बल २६ अश्व बाजारात आल्याने या बाजारात दूरुन खरेदीदार दाखल होऊ लागले आहेत.

खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर अकलूजच्या घोडे बाजाराचे उद्घाटन झाले. पण १७६ घोड्यांची उद्घाटनापूर्वीच विक्री झाली आहे. त्यामधून २ कोटी १० लाख रुपयांची उलाढाल या घोडेबाजारात झाल्याचे बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

वास्तविक यंदा अधिक महिन्यामुळे एक महिना उशिरा बाजार असल्याने बाजारात अजूनही घोडे दाखल होणे सुरूच आहे. आत्तापर्यंत २ हजारापेक्षा जास्त जातिवंत अश्व या बाजारात दाखल झाले आहेत. अकलूजच्या घोडेबाजाराचे हे दहावे वर्ष असून आता हा बाजार दर्जेदार अश्वांच्या विक्रीसाठी देशभरात प्रसिद्धीस आल्यानेच देशभरातील व्यापारी आपले घोडे विक्रीसाठी या बाजारात घेऊन येत असतात. पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या परिसरातून हे घोडे अकलूज बाजारासाठी दाखल झाले असून अजूनही मोठ्या प्रमाणात घोडे दाखल होणे सुरूच आहे.

Leave a Comment