भारतीय फलंदाज ज्यांना आवडत नाहीत त्यांनी खुशाल देश सोडावा – विराट कोहली

virat-kohli
आपल्या फलंदाजी प्रमाणे बोलण्यातही भारताचा कर्णधार विराट कोहली हा आक्रमकपणा दाखवत असतो. विराटमध्ये असाच काहीसा आक्रमकपणा दिसून आला. भारतीय खेळाडूऐवजी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडचे खेळाडू जास्त आवडतात, इतकेच नव्हे तर कोहलीची फलंदाजी पाहण्याऐवजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूची फलंदाजी पाहायला आवडत असल्याचे एका फॅनने सांगितले, त्यावर कोहली जबरी भडकला.

विराटने एका फॅन्सच्या टिकेला व्हिडिओद्वारे उत्तरे दिली आहेत. भारतीय फलंदाज आणि विराट कोहलीवर टीका करणाऱ्या फॅनला विराटने चांगलेच फटकारले. खेळाडू आवडत नसतील तर देश सोडून जाण्यास सांगितले. क्रिकेट फॅन म्हणाला, की कोहली हा ओवररेटेड फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजीत काही विशेष असे नाही. त्या फॅनला उत्तर देताना कोहली म्हणाला, की मी तुला आवडतो किंवा नाही याचे मला काही फरक पडत नाही. आमच्या देशात तू राहून परदेशी खेळाडूंना पसंती देत असशील तर आमच्या देशात राहण्याऐवजी दुसऱ्या देशात राहायला जा असे खडे बोल विराटने फॅनला सुनावले.