रितेशने शाहरुखच्या ‘झिरो’साठी बदलली माऊली’ची रिलीज डेट

ritesh-deshmukh
२१ डिसेंबर रोजी शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट रिलीज होणार असून रितेश देशमुखने त्याच्या आगामी ‘माऊली’च्या रिलीजची नेमकी हिच तारीख ठरवली होती. या दोन्ही चित्रपटांचे युध्द त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार, अशी चर्चा सिने वर्तुळात होती. पण आपला दिलदारपणा दाखवत रितेशने ‘माऊली’च्या रिलीजची तारीख बदलली आहे.

एकाचवेळी ‘झिरो’ आणि ‘माऊली’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाल्यास याचा मोठा फटका ‘झिरो’ चित्रपटाला महाराष्ट्रात बसणार होता. कारण रितेशने रिलीजची तारीख आषाढी एकादिशी रोजीच जाहिर केली होती. याबाबत ‘झिरो’च्या टीमने रितेशला संपर्क साधला असावा. रितेशने अखेर ‘माऊली’चे रिलीज एक आठवडा अगोदर करण्याचा निर्णय घेतला आहे.

रितेशने दाखवलेल्या औदार्याबद्दल शाहरुख खान खूश झाला आहे. त्याने ट्विट करुन रितेशचे आभार मानले आहेत. शाहरुखने ट्विटमध्ये लिहिले आहे, रितेश, दाखवून दिलेस की तू मोठा आहेस. तू मला दिलेल्या आदराबद्दल आणि प्रेमाबद्दल मी आभारी आहे. मी खूप खूश आहे. मला असा दोस्त मिळाल्याचा आनंद आहे जो आपल्या गरजा माझ्या आत्मसन्मानापेक्षा वेगळ्या ठेवतो. रितेशने उचललेल्या या पाऊलाचे सिने वर्तुळात कौतुक होत आहे. त्याचा ‘माऊली’ हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.