मेनका गांधींच्या विरोधात ठोकणार मानहानीचा दावा – शाफत अली खान

avaee
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री मनेका गांधींवर अवनी वाघिनीची गोळी घालून हत्या करणारा शार्पशूटर अजगर अली यांचे वडिल शाफत अली खान यांनी टीका केली असून माझ्या मुलावर मेनका गांधी बिनबुडाचे आरोप करत असून याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याची धमकीच त्यांनी दिली आहे. स्वत:च्या बचावासाठी माझ्या मुलाने वाघिणीवर गोळी झाडली. पण एसीमध्ये निवांत बसून खऱ्या परिस्थितीची माहिती नसताना आरोप करणे चुकीचे असल्याचा टोला त्यांनी मेनका गांधींना लगावला आहे.

शाफत अली खान हे स्वत: एक शार्पशूटर असून लोक काहीही माहिती नसताना माझ्या मुलावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. माझ्या आयुष्यात मी एकाही प्राण्याची सरकारच्या आदेशाशिवाय हत्या केलेली नाही. पोलिसांनी माझ्याविरोधात एकही गुन्हा नोंदवलेला नाही. अवनीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न फसल्यानंतरच माझ्या मुलाने बचावासाठी गोळी झाडली. मात्र, मेनका गांधी कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली. याद्दल मेनका गांधींना कोर्टात खेचण्याची धमकीही त्यांनी यावेळी दिली.