डिसेंबरमध्ये होणार सैन्यभरती

recuritment
पणजी – ६ ते १६ डिसेंबर २०१८ दरम्यान कोल्हापूर (महाराष्ट्र) येथे सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. गोव्यातील उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. ही सैन्यभरती महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी आणि गोव्याच्या दोन्ही दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे.

ही पदे सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क/स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल एव्हिएशन/ऍम्युनिशेन, सोल्जर टेक्लिनकल (एनए अँड व्हीईटी), सोल्जर ट्रेडसमन, जेसीओ (आरटी) (धार्मिक गुरु) आणि हवालदार (सर्वेअर ऍटो कार्टोग्राफर) भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनूसार www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन सैन्यदलाच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.