‘हा’ माजी कर्णधार बंगालमधून लोकसभा निवडणूक लढविणार अझरुद्दीन

Azharuddin
कोलकाता – २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन बंगालमधून लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणत्या पक्षाकडून अझरुद्दीन निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बंगालमधून अझरुद्दीन यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ऑफर दिली जात आहे. त्यांच्या संपर्कात काही स्थानिक आणि राष्ट्रीय पक्ष असल्याचे बोलले जात आहे.

जर का अझहर यांना स्थानिक लोकांनी पांठिबा दिला तर ते कोलकाता येथूनच निवडणूक लढविणार आहेत. निवडणूक कोणत्या ठिकाणावरुन निवडणूक लढविणार याबाबत अद्यापही काहीही बोलले नाही. २०१४ मध्ये काँग्रेसकडून अझहर यांनी उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून निवडणूक लढविली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार सर्वेश कुमार सिंह यांचा पराभव केला होता.