केंद्र सरकारच्या दबावापुढे उर्जित पटेलांनी झुकू नये – राहुल गांधी

rahul-gandhi
नवी दिल्ली – आरबीआयला राखीव असलेले ३.६ लाख कोटी सरकारकडे वर्ग करण्यास अर्थ मंत्रालयाने सांगितले. राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन यावर सरकारवर टीका केली. सरकारने आरबीआयकडे पैशांची विचारणा पंतप्रधानांच्या बुद्धिमान अशा आर्थिक सिद्धांतातून केलेली घाण दूर करण्यासाठी केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारच्या दबावापुढे आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी झुकू नये, अशी विनंतीही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमधून केली.

राहुल गांधी उर्जित पटेलांना उद्देशून सरकारविरोधात झुकू नका, देशाचे संरक्षण करा, असेही म्हणाले. केंद्र सरकारच्या या प्रयत्नामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे आरबीआयने नाराजी व्यक्त करत पैसे देण्यास विरोध केल्याचे माध्यमातील एका वृत्तात म्हटले आहे.

एकूण ९.५९ लाख कोटी आरबीआयने राखीव निधी म्हणून ठेवला आहे. केंद्र सरकारने त्यापैकी ३.६ लाख कोटींच्या निधीची मागणी आरबीआयकडे केली आहे. बाजार जोखीम, कामकाजातील जोखीम, कर्जाची जोखीम अशी विविध कारणांमुळे आरबीआय राखीव निधी ठेवण्यात आला आहे.