दुसऱ्या टी-२० सामन्यांत कर्णधार रोहित शर्माने रचले अनेक विक्रम

rohit-sharma
लखनौ – कर्णधार रोहित शर्माने भारत आणि विंडीज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यांत एक वादळी खेळी करत अनेक विक्रम रचले असून रोहितच्या बॅटमधून दुसऱ्या टी-२० सामन्यात धावांचा पाऊस पडत होता. ६१ चेंडूत त्याने १११ धावांची आतषबाजी केली. त्यात ७ गगनचुंबी षटकार आणि ८ चौकार ठोकले. टी-२० मधील रोहितचे हे चौथे शतक होते. टी-२० सर्वाधिक ४ शतके ठोकणारा फलंदाज बनला. यापूर्वी कॉलिन मुनरो यांने ३ शतक ठोकले आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ८६ सामन्यांत २२०३ धावा केल्या. त्याने या सामन्यात षटकारांचाही पाऊस पाडला. सर्वाधिक षटकार ठोकण्यात तो दुसऱ्या स्थानी आहे. टी-२० मध्ये रोहितने ९६ षटकार ठोकले. ब्रँडन मॅक्युलमला रोहितने पाठीमागे टाकले. ९१ षटकारांची नोंद त्याच्या नावे आहे. ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत १०३ षटकार ठोकत पहिल्या स्थानी आहेत. कॉलिन मुनरोने टी-२० क्रिकेटमध्ये ८३ षटकार खेचले.

टी-२० मध्ये रोहित सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी करणारा फलंदाज आहे. ८ वेळा रोहितने शतकी भागीदारी केली आहे. मार्टिन गुप्टिल आणि अॅलेक्स हेल्स यांना त्याने पाठीमागे टाकले आहे. त्या दोघांनी ७ वेळा शतकी भागीदारी केली आहे. विराट कोहली आणि शिखर धवन सोबत प्रत्येकी ३ वेळा शतकी भागीदारी त्याने केली आहे. कर्णधार या नात्याने २ शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. १९ वेळा रोहितने ५० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त धावा काढणारा फलंदाज बनला आहे. विराटने ५० पेक्षा जास्त धावा १८ वेळा केला तर मार्टिन गुप्टिलने १६ वेळा हा कारनामा केला आहे.