इम्रान हाश्मीच्या ‘टायगर्स’चा फर्स्ट लूक रिलीज

imran-hashmi
‘टायगर्स’ हा नवा चित्रपट घेऊन लवकरच अभिनेता इम्रान हाश्मी तुमच्या भेटीस येत आहे. २१ नोव्हेंबर रोजी झी ५ या चॅनलवर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजीटल प्रीमियर होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून हे पोस्टर सोशल मीडियावर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.


‘टायगर्स’ चित्रपटात सत्यासाठी झगडणाऱ्या एका व्यक्तीची अनोखी कथा दक्वण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅकॅडमी अवॉर्ड विजेते दिग्दर्शक डेनीस टॅनोविक यांनी केले आहे. गितांजली थापा हिची यात महत्त्वाची भूमिका आहे.