एकाही बॉलिवूड कलाकाराला ‘देसी गर्ल’च्या लग्नाचे आमंत्रण नाही?

priyanka-chopra
सध्या प्रियंका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून साहजिकच संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष ‘देसी गर्ल’च्या लग्नाकडे लागले आहे. पण ताज्या बातमीनुसार, आपल्या लग्नात कोणत्याच बॉलिवूड कलाकाराला प्रियंका आमंत्रित करणार नाही.

याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंकाच्या लग्नात याआधी सलमान खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, फरहान अख्तर, सिद्धार्थ राय कपूर हे उपस्थित राहणार अशा चर्चा होत्या. पण या लग्नात आता केवळ प्रियंका व निकचे अतिशय जवळचे नातेवाईक व मित्र यांचाच सहभाग असेल.

प्रियंकाचा संगीतसोहळा ३० नोव्हेंबरला आहे. या संगीत सोहळ्यात निक आणि प्रियंका दोघेही परफॉर्म करणार आहे. निक प्रियंकासाठी लव्ह साँग्स गाताना दिसणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये त्यांच्या ग्रॅन्ड विवाह सोहळा पार पडणार आहे.