पाकिस्तानात काटछाट न करता प्रदर्शित होणार ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’

thugs-of-hindustan
प्रेक्षक आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’ चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहे. अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ यांचा दमदार अभिनय यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आमिर आणि बिग बी पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र स्क्रिन शेअर करत आहे. अशातच एक खास माहिती या चित्रपटाबद्दल समोर आली आहे. ती म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा ‘ठग्स ऑफ हिन्दोस्थान’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कुठलीही काटछाट न करता हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटाविषयी सांगायचे म्हटल्यास, आमिर खान फिरंगी भल्लाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर अमिताभ बच्चन खुदाबक्श आझाद आणि कॅटरिना कैफ सुरैयाची भूमिका निभावणार आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.